एक लाख 31 हजार चा ऐवज चोरट्यांनी लांबवला, बार्शी तालुक्यातील घटना

0
22

एक लाख 31 हजार चा ऐवज चोरट्यांनी लांबवला, बार्शी तालुक्यातील घटना

बार्शी: तालुक्यातील भालगाव मधील एका मोटरसायकल स्वराचा एक लाख 31 हजारचा ऐवज चोरट्यांनी लांबवला असल्याची घटना उघडकीस आली आहे. सत्यवान निवृत्ती नरसुडे वय (41 वर्षे) रा. भालगाव ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे फिर्यदिप्रामाने १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वा. चे सुमारास मी उस्मानाबाद येथे दुध विक्री करण्यासाठी गेलो जातानाच मी घरुन सोन्याच्या बांगड्या मोडण्यासाठी घेऊन गेलो होतो. उस्मानाबाद येथे दुध विक्री झाल्यानंतर मी सिध्दी ज्वेलर या सोन्याच्या दुकानदारास सोन्याच्या बांगड्या विकण्यासाठी फोन केला ते आल्यानंतर त्यांना तिन तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या दिल्या त्याचे 1,44,000१,४४,०००/- रु झाले ते मला त्यांनी काही वेळाने दिले. ते पैसे घेऊन सायंकाळी ४.३० वा. चे सुमारास माझे वाघाचे शेतात गेलो.

शेतात काही वेळ काम करुन सायंकाळी ६.०० वा. चे सुमारास मी एकटाच माझ्या मोटारसायकलवरुन घराकडे निघालो त्यावेळी भालगावकडुन १) विशाल पनिलाल कराड व २) नितीन पनिलाल कराड दोघे रा. भालगाव ता. बार्शी जि. सोलापुर हे समोर आले व या दोघांनी फिर्यादी ची मोटारसायकल आडवली व विशाल कराड म्हणाला की, तु तलाठ्याकडे का अर्ज दिला, तुझी लायकी आमच्या एवढी आहे का असे म्हणाला त्यावेळी मी म्हणालो की, माझे काम आहे म्हणुन मी अर्ज दिला. त्यावेळी आमची बाचाबाची होऊन विशाल याने मला धक्काबुक्की केली व नितीन याने माझे पेंटचे उजवे खिशातील 1,31,000/- रु. (ज्या मध्ये 2,000/- रु च्या 50 नोटा, 500 रु च्या 40 नोटा व 100 रु. च्या 110 नोटा होत्या) ती रक्कम व माझे लायसन नितीनने काढुन घेतला व ते दोघेजन त्यांचे मोटारसायकलवर भालगाव गावाकडे निघुन गेले विशाल कराड यांच्याकडे स्लेंडर दुचाकी गाडी व नितीन याच्याकडे निळ्या रंगाची पशन दुचाकी गाडी होती.

रात्र असल्यामुळे त्याच्या गाडीचा नंबर दिसला नाही. त्यानंतर मी भालगाव गावाकडे जावुन गावातुन दुध घेऊन उस्मानाबादला गेलो व उस्मानाबाद येथे दुध विक्री केली नंतर मी भालगाव येथे आलो. व मी नंतर रात्रौ १०.०० वाजता पोलीस ठाणे वैराग येथे येऊन तक्रारी अर्ज दिला. तरी दि.14/10/2021 रोजी सायंकाळी 06/00 वा. चे सुमारास मी माझे शेतातुन घराकडे जाताना इसम नामे 1) विशाल पनिलाल कराड व 2) नितीन पनिलाल कराड दोघे रा. भालगाव ता. बार्शी जि. सोलापुर यांनी माझी मोटारसायक आडवुन मला धक्काबुक्की करुन जबरदस्तिने माझे पन्टचे खिशातील 1,31,000/- रु. काढुन घेऊन गेले आहेत.पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here