सोलापूर -जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे. आज बुधवारी तब्बल 40 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. यामध्ये तेवीस पुरुष तर 17 महिलांचा समावेश आहे ,तर एकाचा मृत्यू झाल्याची माहितीही देण्यात आली आहे.

आज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 12 आहे. यामध्ये पाच पुरुष तर सात महिलांचा समावेश होतोय.
आज बुधवारी दक्षिण सोलापुरातील बक्षी हिप्परगा मध्ये एक महिला, नवीन विडी घरकुल मध्ये तीन पुरुष ,दोन महिला, होटगी स्टेशन येथे एक महिला ,लिंबी चिंचोळी येथे एक पुरुष कुंभारी येथे एक महिला बाधित असल्याचे आढळून आले आहे.

सध्या पंढरपूर शहर येथे राहत असणारे पण मुंबई येथील दोघा पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर ,पंढरपूर मधील तालुका पोलीस स्टेशनच्या पाठीमागे एक पुरुष गणेश नगर मध्ये एक पुरुष ,शेगाव दुमाला मध्ये एक महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .मोहोळ तालुक्यामध्ये आष्टी येथे एक महिला तर महबूब नगरमध्ये एक महिलेचा रिपोर्ट कोरोना बाधीत आला आहे .

अक्कलकोट तालुक्यातील किस्तके मळा येेेथे 1 पुरुष एक महिला, माणिक पेठ परिसरामध्ये तीन पुरुष एक महिला बुधवार पेठ मध्ये एक महिला तर उत्तर सोलापुरातील बाणेगाव येथे दोन पुरुष ,तर मार्डी येथे तब्बल नऊ पुरुष आणि सहा महिलांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे

आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 401 इतकी झाली आहे यामध्ये 249 पुरुष तर 152 महिलांचा समावेश होतो तर आजपर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे त्यात बारा पुरुष सहा महिला आहेत.
बुधवार पेठ अक्कलकोट येथील 68 वर्षाचे पुरुष 24 जून रोजी सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .उपचारादरम्यान 30 जून रोजी सकाळी त्यांचे निधन झाले त्यांचा covid-19 अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.