बार्शी! ट्रॅक्टर रानातून न्यायचा नाही म्हटल्यामुळे एकाला जबर मारहाण ; बार्शी तालुक्यातील पांढरी गावातील घटना.
बार्शी तालुक्यातील पांढरी गावांमध्ये आमच्या शेतातुन द्राक्ष फवारणी साठी ट्रॅक्टर घ्यायचा नाही, असे म्हटल्यामुळे एकाला जबर मारहाण केल्याची घटना 20 नोव्हेंबर रोजी घडली आहे. नेताजी हणुमंत घावटे ,(वय 31)रा-पांढरी , ता बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पांगरी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेतात शेती गट नं 714 द्राक्ष ची बाग फवारणेसाठी पाणी भरत असताना आमचे गावातील आनंत गणपत घावटे, रामराजे गणपत घावटे, अच्युत नवनाथ घावटे तीघे रा पांढरी त्यांना माझे शेतातुन ट्रँक्टर घेवुन जावु नका म्हणालेचे कारणांवरून मला शिवीगाळी करून माझए अंगावर धावुन येवुन मला दगडाने व हाताने लाथा बुक्याने मारहाण करून शिवीगळी करून गच्चुरीला धरून जीवे मारण्याची धमकि दिली आहे. अशी माहिती पांगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी दिली आहे.