हे भविष्यवाणी कशाच्या आधारे करतात, थोरातांचा राज ठाकरेंना टोला…..!
“हे सरकार जास्त काळ टिकणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं आताही सांगतोय हे सरकार जास्त काळ टिकणार नाही” अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांनी एबीपी माझा मीडिया समूहाने घेतलेल्या मुलाखतीत बोलून दाखवल होते. राज ठाकरे यांच्या या टीकेला आता मंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रतिउत्तर दिले आहे.


“महाविकास आघाडी सरकार टिकणार आणि आपला पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करणार” असा दावा थोरातांनी केला” त्याच बरोबर “सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी भविष्यवाणी हे कशाच्या आधारे करतात, हेच मला समजत नाही” असे बोलून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला सुद्धा लगावला होता.
हे भविष्यवाणी कशावर आणि कशाच्या आधारे करतात हे मला काही समजलेलं नाही. फार कमी कालखंड आम्हाला मिळाला आहे. त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आघाडी सरकारचं काम पाहिलं, तर ते निश्चितच चांगलं आहे. कामांची यादी पाहिली तर खूप मोठी आहे आणि किमान समान कार्यक्रम आम्ही राबवत आहोत असे सुद्धा मंत्री थोरातांनी बोलून दाखविले होते.