उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी 237 कोरोना रुग्णांची वाढ; तर 6 जणांचा मृत्यू
उस्मानाबाद, दि. 26 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 237 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 350 जण बरे होवून घरी परतले आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 454 झाली आहे. यातील 8 हजार 772 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 341 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 341 जणांवर उपचार सुरु आहे.