नवी दिल्ली, 18 जुलै : एकीकडे इंधनाचे वाढते दर पाहता इलेक्ट्रिक कारची विक्री आणि उत्पादन आणखी वाढावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिक वाहनांना आता एक वेगळी ओळख मिळणार आहे. त्याच बरोबर बीएस-6 वाहनांसाठी नंबर प्लेटवर नवीन रंग आणि स्टिकर असणार आहे.


आता यापुढे इलेक्ट्रिक गाड्यांची नंबर प्लेटही वेगळ्या रंगाची असणार आहे. या गाड्यांची नंबर प्लेट हिरव्या रंगात असणार आहे. याबद्दल केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, ‘ज्या गाड्या या बॅटरीवर चालणाऱ्या आहे. त्या गाड्यांची वेगळी ओळख असावी यासाठी त्यांच्या नंबर प्लेट या हिरव्या रंगात असणार आहे आणि त्यावर पिवळ्या रंगाची अक्षर असावी.’
याबद्दल दळणवळण मंत्रालयाने एक अध्यादेश जारी केला आहे. या गाड्यांची नोंदणी करत असताना नंबर प्लेट ही पिवळ्या रंगात असणार आहे आणि त्यावर लाल रंगात अक्षर असतील. परंतु, डिलरकडे असलेल्या गाड्यांची नंबर प्लेटही लाल रंगाची असावी आणि त्यावर पांढऱ्या रंगात अक्षरं असावी. राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशात वाहनांनी नोंदणी आणि चिन्हांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.