आता बार्शीतील बार्शी मार्केट यार्डात जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होणार संगणकीकृत
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील पहिला प्रयोग, जनावरांसह खरेदी विक्रीच्या व्यवहाराचे होणार संगणकीकरण, चेअरमन रणवीर राऊत यांची माहीती
बार्शी: येथील लातुर रोड व वैराग बाजार समितीत जनावरांच्या बाजारात एकूण ४ कोटी ४५ लाख रुपये
खर्चुन नव्याने जनावर निवारा ५० शेड उभा करून अद्यावत सोयी सुविधा देण्याच्या विषयासह बाजार समितीत खरेदी विक्री झालेल्या व्यवहाराची संगणकीकृत नोंद बाजार समितीकडे असणार आहे. पशुपालकाची फसवणूक टाळण्यासाठी व पारदर्शी व्यवहारासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. बाजार समितीच्या सभेत या विषयास मंजुरी मिळाली आहे. असा प्रयोग राबविणारी बार्शी ही राज्यातील पहिली बाजार समिती असल्याची माहीती चेअरमन रणवीर राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या सभेस व्हाईस चेअरमन झुंबर जाधव, संचालक रावसाहेब मनगिरे, शिवाजी गायकवाड, वासुदेव गायकवाड, बापूसाहेब शेळके, सचिन जगझाप, पिंटू घोडके, शालन गोडसे, प्रभावती काळे, आण्णासाहेब कोंढारे, चंद्रकांत मांजरे, अभिमन्यू डमरे, अरुण येळे,कुणाल घोलप, साहेबराव देशमुख बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे, पर्यवेक्षक मिरगणे बी.एल.आदी उपस्थित होते.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडलेल्या सभेत लातुर रोड येथील बाजार समितीच्या जागेत
नव्याने ३ कोटी १० लाख रुपये खर्चुन ३५ जनावरांचे निवारा शेड, दावण, पाणी निचऱ्याची सोय, लाईट सुविधा,हायमास्ट सुविधा, ४ ठिकागी जनावर लोडींग व्यवस्था, ३ पाण्याचे हौद, अशी अद्यावत सोयी असणार आहेत.याचे काम अंतिम टप्यात असून लवकरच या ठिकाणी जनावर बाजार सुरु होणार आहे. तर वैराग येथील उपबाजार समितीच्या आवारातही १ कोटी ३५ लाख रुपये खर्चुन जनावरांसाठी १५ निवाराशेड, दावण, लाईटची
सोय, हायमास्ट सुविधा, पाण्याचे ३ हौद, आदी सोयी सुविधाचे काम प्रगतीपथावर आहे.
तसेच लवकरच लातूर रोड येथे बाजार समिती जागेत जनावरांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे.यासोबतच जनावरांचे लसीकरण, आजारावर तज्ञ पशुचिकित्सकांची भेटी, दुध उत्पादन वाढीसाठी पशु तज्ञांची व पशुपालक शेतकऱ्यांची कार्यशाळेचे आयोजन, पशुधन वाढीसाठी पशुपालकांना संबंधित बँकाकडून अर्थसहाय्यासाठी बाजार समिती प्रयत्न करणार आहे. असे विविध उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती राबवणार असल्याचे चेअरमन रणवीर राऊत यांनी सांगितले.
या जनावरांच्या बाजारात खरेदी विक्रीसाठी आलेल्या शेतकरी व पशुपालकांची फसवणूक होवु नये.
यासाठी बाजारात येणारे बैल, गाय, म्हैस, रेडा, घोडा, शेळ्या, मेंढ्या, या सर्व जातीचे जनावरांच्या व्यवहारानंतर घेणार- देणार मालक यांचे फोटो सही व जनावराच फोटो त्याचे वर्णन, किंमत अशा संपूर्ण होणाऱ्या व्यवहाराची नोंद संगणकावर होणार आहे. व तसा दस्त केला जाणार आहे. ही योजना बार्शी व वैराग या दोन्ही बाजार समितीत सुरु होणार आहे. यामुळे पशुपालकांची होणारी फसवणूक थांबणार आहे. यासाठी बाजार समितीने संगणक प्रशिक्षित कर्मचारीची व्यवस्था केली आहे. तर यामुळे बाजार समितीच्या आर्थिक उलाढालही उत्पन्न वाढणार आहे.