अबब.. मुंबईने चीनला सुद्धा टाकले मागे….! वाचा सविस्तर-

0
186

अबब मुंबईने चीनला सुद्धा टाकले मागे….!

सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यातच मुंबईच्या आकड्याने कोरोनाचा उगम झालेल्या चीनला सुद्धा मागे टाकले आहे. मुंबईतील करोना रुग्णांची संख्या आणि मृतांची आकडेवारीचा आज विचार केला तर चीनपेक्षाही अधिक असल्याची माहिती समोर आल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज तागायत चीन आणि मुंबईची तुलना गारव्याची झाली तर चीनमध्ये सध्या ८५ हजार ३२० करोनाबाधित आहेत. तर मुंबईत हा आकडा ८५ हजार ७२४ एवढा आहे. चीनमध्ये आतापर्यंत करोनाने ४ हजार ६४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत ४ हजार ९३८ लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सर्व्हे, क्वॉरंटाइन सेंटरच्या संख्येत वाढ, चेस द व्हायरस सारख्या मोहिमा आदी उपाय योजना करूनही मुंबईतील करोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. वरळी, धारावी, भायखळा आणि अंधेरी-जोगेश्वरी परिसरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here