राज्यात दोन नव्हे तीन मुख्यमंत्री, विनायक मेटे याचा टोला….!
राज्याचा कारभार दोन मुख्यमंत्री पाहत असल्याचा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना लागवलेला असताना शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा आघाडी सरकारवर टीका केलेली आहे. राज्यात दोन नव्हे, तीन मुख्यमंत्री आहेत. तिसरे मुख्यमंत्री तर सुप्रीम आहेत, असा टोला विनायक मेटे यांनी लगावला आहे.


विनायक मेटे यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यात तीन मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ नावालाच मुख्यमंत्री आहेत. दुसरे मुख्यमंत्री हे अजित पवार असून ते मंत्रालयातून कारभार हाकत आहेत. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे तिसरे मुख्यमंत्री असून ते सुप्रीम मुख्यमंत्री आहे, असा टोला विनायक मेटे यांनी लगावला आहे.

राज्यात तीन पक्षाचे सरकार असलेतरी खऱ्या अर्थाने दोनच पक्षाचे हे सरकार आहे. त्यातही हे तीन मुख्यमंत्री आहेत. चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात जे सांगितलं त्यात चुकीचं असं काहीच नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.