वैराग : वैराग नगरपंचायत निवडणुकीत निरंजन भूमकर व त्यांच्या पत्नी तृप्ती भूमकर निवडून आले तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद निंबाळकर हे सोपल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून तर त्यांच्या पत्नी सुप्रिया निंबाळकर शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून मैदानात होत्या. दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच माजी आमदार कै. चंद्रकांत निंबाळकर यांचे
नातू शाहूराजे निंबाळकर हे निवडून
आले.

… तर निरंजन भूमकर होतील पहिले नगराध्यक्ष
वैराग नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निरंजन भुमकर यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 13 जागा मिळवत निर्विवाद झेंडा फडकावत निर्विवाद यश मिळविले आहे. या निवडणूकीत भाजपाला 4 जागेवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे, नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण किंवा पुरुष गटाचे आरक्षण राहिल्यास निरंजन भूमकर हेच वैराग नगर पंचायतीचे पहिले नगराध्यक्ष होतील.
राष्ट्रवादीचे नेते निरंजन भुमकर यांनी एक हाती सत्ता काबीज केली असून निकालानंतर भूमकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ‘ स्वाभिमानाचा ‘ विजय झाला आहे. वैराग नगर पंचायतीची पहिली निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली , आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तर माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लढविली गेली.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
अतुल मोहिते-राष्ट्रवादी काँग्रेस
निरंजन भूमकर-राष्ट्रवादी काँग्रेस
तृप्ती भूमकर -राष्ट्रवादी काँग्रेस
अनुप्रिया घोटकर-राष्ट्रवादी काँग्रेस
सुजाता डोळसे -राष्ट्रवादी काँग्रेस
गुरुबाई झाडमुखे-राष्ट्रवादी काँग्रेस
आसमा मिर्झा-राष्ट्रवादी काँग्रेस
पद्मिनी सुरवसे-राष्ट्रवादी काँग्रेस
जैतूनबी बागवान -राष्ट्रवादी काँग्रेस
अक्षय ताटे-राष्ट्रवादी काँग्रेस
अजय काळोखे -राष्ट्रवादी कॉंग्रेस
नागनाथ वाघ-राष्ट्रवादी काँग्रेस
जयश्री घोडके – राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीशैल भलशंकर -भाजपा
राणी आदमाणे-भाजपा
शाहू निंबाळकर -भाजपा
अर्चना माने रेड्डी -भाजपा