बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथे सासरच्या त्रासास कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

बार्शी : खव्याचा व्यवसाय करण्यासाठी माहेरहून एक लाख रूपये घेऊन येण्याच्या कारणावरून नवविवाहितेस जाचहाट करूण तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथे घडला.
पल्लवी परिक्षीत मुंढे वय 21 रा.उक्कडगाव असे स्वतः गळफास लावून घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
छाया सुमंत मुंढे (सासु) व परिक्षीत सुमंत मुंढे (नवरा) अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

खंडु बिकड वय 38 रा.नाहोली ता.केज जि.बीड यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीची पुतनी पल्लवी हिस सासु व पतीने खाव्याच्या व्यवसायासाठी माहेरहून एक लाख रूपये आणण्यावरूण शिविगाळ केली.तसेच मारहाण करून उपासी पोटी ठेऊन जाचहाट केला.त्यामुळे तिने राहत्या घरी सिलिंग फॅनला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटले आहे.
पांगरी पोलीस ठाण्यात पती व सासुवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनी सुधीर तोरडमल हे करत आहेत.