सिरम इन्स्टिट्यूटला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट;कोरोना लस निर्मिती प्रयत्नाचे केले कौतुक

0
429

ग्लोबल न्यूज – पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि.1) रोजी भेट दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लस तयार करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट प्रयत्नशील आहे.

सीरम इन्स्टिट्यूटकडून विकसित केल्या जात असलेल्या करोनावरील लशीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती घेत आढावा घेतला. त्यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांच्याशी या लशीसंदर्भात सविस्तर चर्चा केली तसेच, मांजरी येथील लशीच्या मुख्य प्रकल्पास भेट देऊन त्याची पाहणी केली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जगातील 189 देशांमध्ये सिरम इन्स्टिट्यूट मधून लशींचा पुरवठा केला जातो. यात पोलिओ, फ्ल्यू, रूबेला अशा आजारांवरील लशींचा समावेश आहे. वर्षाला दीड अब्ज लशींचे डोस येथे तयार केले जाऊ शकतात.

जगभर धैमान घालणार्या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लस निर्मितीसाठी जगभरात स्पर्धा सुरु आहे. काही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील चाचण्या संपून दुसऱ्या टप्प्यातील अनेक कंपन्यांच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. या लस निर्मितीच्या स्पर्धेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने देखील उडी घेतली असून त्यांनी जगातील सात कंपन्याशी लशीच्या संशोधन, उत्पादन प्रक्रियेसाठी भागीदारी केली आहे. त्या भागीदाराच भाग म्हणून त्यांनी विकसित केलेली लस ही

टप्प्याकडे असली तरी त्याला अद्याप डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे डॉ. सायरस आणि आदर पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here