भारत आणि चीनमध्ये सध्या पूर्व लडाखवरुन चकमकीवरुन तणाव असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे लेहचा दौरा करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. नरेंद्र मोदींसोबत यावेळी भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतदेखील उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांनी लेहमधील निमू इथे भारतीय जवानांशी संवाद साधत त्यांना संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदींनी जवानांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे यानिमित्ताने जाणून घेऊयात.

संपूर्ण जगाने भारतीय लष्कराचं सामर्थ ओळखलं आहे. हिमालयापेक्षा उंच भारतीय सैन्याची ताकद आहे.,
गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांनी केलेली लढाई पराक्रमाची परिसीमा आहे.कमकुवत कधीही शांतता प्रस्थापित करु शकत नाही, शुरपणाच शांतता आणू शकेल.

भारत जल, वायू आणि जमीन सर्व ठिकाणी शक्तीमान आहे. भारताची आधुनिक शस्त्रास्त्रं शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि माणुसकीच्या चांगल्यासाठीच आहेत.

विस्तारवादाचं युग संपलं आहे. हे युग विकासवादाचं असून या काळात विकासवादच भविष्याचा आधार आहे.

इतिहासात विस्तारवादानंच जगाचं मोठं नुकसान केल्याचं पाहायला मिळतं, यामुळे शांततेला अडथळा होतो. विस्तारवाद नेहमीच नष्ट झालाय किंवा त्यांना झुकावं लागलं आहे.


भारतीय महिला सैनिकांना युद्धाच्या मैदानात पाहणं
प्रेरणादायक आहे.

भारताच्या सुरक्षेचा विचार करताना मी भारत माता आणि भारताच्या या वीरपुत्रांना जन्म देणाऱ्या मातेचाच विचार करतो.

आपण तेच लोक आहोत जे हातात बासुरी घेतलेल्या कृष्णाची पूजा करतो आणि हातात सुदर्शन असलेल्या कृष्णाचंही अनुकरण करतो.

हिमालय जिंकणं आपलं ध्येय, आपला पण आहे.
ही धरती शुरांची आहे, तिचं संरक्षण करणं हाच आपला संकल्प आहे.

भारतीय सैन्याच्या साथीने आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होईल.

लेह दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा दिल्लीला रवाना झाले (सर्व फोटो सौजन्य ANI)
