नारायण राणेंची टीका:एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना, खरे गद्दार उद्धव ठाकरेच!
शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे संपलेले आहेत. त्यांचे अस्तित्व उरलेले नाही. शिवाजी पार्कवर आता बोलण्यासारखे त्यांच्याकडे काय उरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे. खरे गद्दार उद्धव ठाकरेच आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी मंगळवारी (ता.३०) येथे केली.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्स्प्रेस या विशेष ट्रेनला राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राणे यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केले. गणरायाच्या कृपेने महाविकास आघाडी सरकार जाऊन भाजप व शिंदे गटाचे सरकार आले आहे.