नगरपालिका कर्मचारी सुशील सोनवणे यांची आत्महत्या; चिठ्ठीत अनेक सावकाराची नावे
प्रतिनिधी | बार्शी येथील नगरपालिकेचे कर्मचारी सुशील साहेबराव सोनवणे वय ५३ रा उपळाई रोड, वायकुळे मंगल कार्यालयाचे पाठीमागे, बार्शी यांनी अज्ञात कारणावरून गळफास घेवून आत्महत्या केली.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


दि २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मानस सुशील सोनवणे याने याप्रकरणी पोलिसात खबर दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.आत्महत्येचे नेमके कारण समजल नसले तरी ते कर्जबाजारी झाले होते.शिवाय यांच्याकडे अनेक खाजगी सावकारांचे कर्ज असल्याची चर्चा सुरू आहे.