मुंबईकरांनो घराबाहेर पडताना ओळखपत्र जवळ ठेवा

0
610

घराबाहेर पडताना मुंबईकरांनो ओळखपत्र जवळ ठेवा

मुंबईकरांनो घराबाहेर पडताना स्वतःजवळ आपले ओळखपत्र नाही तर पोलीस कारवाइला सामोरे जा अशा सूचना मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिल्या आहेत. दोन किलोमीटरच्या परिसरातच प्रवास करण्याची अट राज्य सरकारकडून नुकतीच माघार घेण्यात आली आहे. मात्र घरातून बाहेर सार्वजनिक ठिकाणी किंवा कामासाठी प्रवास करताना आता ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुंबई शहरातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडाही भयावह पद्धतीने वाढला आहे. अशा परिस्थितीत सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्याचं महत्व जास्तच वाढणार आहे. मात्र अनलाॅक १ सध्या सुरू असताना लोकांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर बराचसा वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दररोज नवीन नियम लागू केले जात असताना, आता प्रशासनाकडून या नव्या नियमाचीही अमंलबजावणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here