MPSC Result | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; सातारचा प्रसाद चौगुले व उस्मानाबाद चा रवींद्र शेळके अव्वल

0
542

MPSC Result | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; सातारचा प्रसाद चौगुले व उस्मानाबाद चा रवींद्र शेळके अव्वल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यात सातारचा प्रसाद चौगुले हा राज्यात पहिला आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुंबई : : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौगुले हा राज्यात पहिला तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके हा मागासवर्गवारीत प्रथम तर अमरावतीची पर्वणी पाटील महिला वर्गवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे.

एपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी राज्यातील एकूण 6825 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यामधून 1326 विद्यार्थी मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहेत. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात 420 जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना जर पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करायचा असल्यास त्यांनी निकाल लागल्यानंतरच्या 10 दिवसाच्या आतमध्ये ऑनलाईन पद्धतीने करावा असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन वेळापत्रकाबाबत संभ्रम कायम
कोरोना संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर आयोगानं परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.

कोरोना संकटामुळे स्थगित झालेल्या यूपीएससीच्या विविध परीक्षांसाठीचं नवं वेळापत्रक आयोगानं जाहीर केलं आहे. 2020 वर्षात होणाऱ्या परीक्षांसाठी हे नवं वेळापत्रक यूपीएससीच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलंय. सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा जी आधी 31 मे रोजी नियोजित होती, ती लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आली होती.

नव्या वेळापत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. शिवाय 2019 च्या परीक्षेमध्ये मुलाखतीचा टप्पा कोरोनामुळे अपूर्ण राहिला होता. ज्या उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या, त्या 20 जुलैपासून सुरु होणार आहेत. त्याबाबत उमेदवारांना वैयक्तिक पत्राद्वारे तारीख कळवली जाईल. एनडीएची परीक्षा 10 जून रोजी होणार आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here