अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याची खासदार पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
162

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याची खासदार पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची भेट घेतली. या भेटी डार्मनाय्त हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करून त्याना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झालेला आहे. त्यातंच सुरवाती पासूनच पडणाऱ्या दमदार पावसामुळे मृगनक्षत्राच्या सुरवातीला चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र अनेक ठिकाणी बियाणांची उगवण न झाल्यामुळे व काही ठिकाणी अतिवृष्टीने पीक करपून गेले त्यामुळे आधीच शेतकरी हवालदिल होऊन संकटात आलेला आहे.

त्यानंतर आता या भागात गुरुवारी पहाटे ढगफुटी झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असून या पावसामुळे हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली, याभागातील नदी-नाले व ओढ्याना मोठा पूर आल्यामुळे हजारो जनावरे दगावली आहेत. तसेच नदीकाठी असलेल्या घरांचे शेतातील आखाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी सर्व परिस्थितीची माहिती घेऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे तात्काळ पंचनामे विनाविलंब आर्थिक मदत देण्यात यावे अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here