मोटरसायकलस्वाराने दिली कारला धडक; बार्शी बायपास जवळची घटना

0
140

बार्शी : मोटरसायकल स्वाराने कारला धडक दिल्याने जखमी होऊन कारचे व मोटरसायकलचे नुकसान झाले. ही घटना स्वामी समर्थ चौक, परांडा रोड बायपास बार्शी येथे घडली.
याबाबतची माहिती अशी, दि. ८ एप्रिल २०२२ रोजी राहुल हनुमंत शिंदे (वय ३४) रा.कन्हेरवाडी, ता.कळंब, जि.उस्मानाबाद हे पुणे येथून सेलेरिओ कार क्र. एमएच-१४-जेए-३७४७ घेऊन कन्हेरवाडी येथे जात होते. दुपारी तीनचे सुमारास कुर्डूवाडी लातूर बायपासने जात असताना, स्वामी समर्थ चौक, परांडा रोड, बायपास या ठिकाणी आले असता, बार्शी शहराकडून एक मोटरसायकलस्वार (क्र. एमएच-१२-एचके-९२५८) ईश्वर परमेश्वर शिंदे (वय ४८), रा. बार्शी यांनी भरधाव वेगाने येऊन कारच्या समोरील उजव्या हेडलाईटजवळ जोराची धडक दिली. त्यामध्ये ईश्वर शिंदे हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. राहुल शिंदे यांनी त्यांना उपचारासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे नेले.
सदर अपघातामध्ये माझ्या कारचे व मोटार सायकलचे अंदाजे सव्वा लाख रुपयांचे नुकसान केले आहे, अशी तक्रार राहुल शिंदे यांनी ईश्वर शिंदे यांच्या विरुध्द पोलिसात केली आहे. त्यानुसार बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here