रुक्मिणी माता हिरव्या रंगाच्या पैठणीत तर, बा विठ्ठल हिरव्या रंगाच्या धोतर उपरणांत…..
गणेश चतुर्थीचा सण आनंदाने साजरा केला जात आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणरायाचे आगमन होते. महाराष्ट्राची शान असलेल्या या सणानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येही आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वांनी मंदिराचा गाभारा सजवण्यात आला आहे. तसंच मंदिरात अष्टविनायकाची रुपं साकारण्यात आली आहेत.

दरम्यान कोरोना संकटामुळे महाराष्ट्रात अद्याप मंदिरं दर्शनासाठी खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन भाविकांना ऑनलाईनच घ्यावे लागणार आहे.
आज रुक्मिणी माता हिरव्या रंगाच्या पैठणीत सजली आहे. तर विठ्ठल देवही हिरव्या रंगाच्या धोतर, उपरणांत दिसत आहे.
या नव्या साजात विठ्ठल-रुक्मिणीचे रुप अधिकच विलोभनीय दिसत आहे.