कोरोना रुग्ण २० लाखाच्या पुढे मोदी सरकार बेपत्ता, राहुल गांधींची टीका…..!

0
313

कोरोना रुग्ण २० लाखाच्या पुढे मोदी सरकार बेपत्ता, राहुल गांधींची टीका…..!

सध्या देशभरात कोरोना रुंगांच्या संख्येत अतोनात वाढ होताना दिसत आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढलेले दिसून येत आहे. याच पाश्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवत कोरोनाच्या वाढत्या संकटावरून टीका केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गुरुवारी कोरोनाच्या संख्येने २० लाखाचा आकडा पार केला आहे. त्याच संदर्भात ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आतापर्यंत २० लाखांचा टप्पा ओलांडला गेला आहे, मोदी सरकार बेपत्ता झाले आहे, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

१७ जुलै रोजी जेव्हा देशात कोरोना रूग्णसंख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला होता, तेव्हाही राहुल गांधी यांनी असेच ट्विट करत सरकारवर निशाणा साधला होता. १७ ऑगस्टच्या आपल्या ट्विटमध्ये १० ऑगस्टपर्यंत देशातील कोरोना रूग्णांची संख्या २० लाखांवर पोहचेल असे राहुल गांधींनी म्हटले होते. सरकारने हा संसर्ग रोखण्यासाठी ठोस आणि कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here