आमदार राऊतांनी लावला मिरगणेंच्या गडाला सुरुंग; वाचा सविस्तर-

0
60

आमदार राऊतांनी लावला मिरगणेंच्या गडाला सुरुंग; वाचा सविस्तर-

बार्शी: आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडून, ग्रामीण भागात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. असे मांडेगावचे कर्तव्यदक्ष आणि युवा विद्यमान सरपंच सुधाकर (पंडित) मिरगणे व उपसरपंच देवदत्त मिरगणे यांनी मांडेगाव येथील शेकडो युवक आणि ग्रामस्थांसह भाजप नेते राजेंद्र मिरगणे गटाला सोडचिठ्ठी देत आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत राऊत गटात जाहीर प्रवेश केला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याप्रसंगी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली आपण प्रामाणिकपणाने जनतेची सेवा करणार असल्याचे पंडित मिरगणे यांनी म्हटले.

यावेळी बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक, भाजपा तालुका सरचिटणीस मुकेश डमरे, खडकलगांवचे सरपंच दिपक रोंगे, विलास मिरगणे, बबनदादा मिरगणे, सचिन मिरगणे, मनोज मिरगणे, आप्पा आडसुळ, दादा मिरगणे, भारत मिरगणे, सुभाष देवकुळे, आण्णा कवडे, अरविंद मिरगणे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंडित मिरगणे हे मांडेगावचे सरपंच असून ते राजेंद्र मिरगणे यांचे जवळचे नातेवाईकही आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपा पक्षप्रवेशाची चर्चाही रंगली होती. मात्र, रविवारी त्यांनी राजेंद्र राऊत यांचे नेतृत्व स्विकारत चर्चेला पू्र्णविराम दिला. पंडित यांनी गावपातळीवर केलेल्या कामाबद्दल त्यांचा लोकमततर्फे गौरव करण्यात आला होता. तसेच, कोरोना काळातील कामाचेही अनेकांनी कौतुक केले होते.

ते सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष देखील आहेत. हा मिरगणे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here