आ.राणाजगजितसिंह पाटील कोरंटाईन ! स्टाफमधील तब्बल 6 जणांना झाला कोरोना !!

0
674

आ.राणाजगजितसिंह पाटील कोरंटाईन ! स्टाफमधील तब्बल 6 जणांना झाला कोरोना !!

उस्मानाबाद- जिल्ह्यात कोरोचा विळखा वाढतच चालला आहे. रुग्णांच्या संख्येत देखील दररोज मोठयाने वाढ होत आहे. लोहारा-उमरगाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यानंतर आमदार सुजितसिंह ठाकूर यांनाही कोरोना झाला आहे. त्यांच्या संपर्कातील सात ते आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आणखीन एक मोठी बातमी आली असून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उस्मानाबाद येथील स्टाफ मधील तब्बल सहा जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या स्टाफच्या संपर्कात आलेल्यांना चिंतेनं ग्रासले आहे. आ.राणाजगजितसिंह पाटील यांनीही स्वतःला कोरंटाईन करून घेतले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

‘माझ्या सोबत असणाऱ्या स्टाफ पैकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सोबतच्या सर्व स्टाफची चाचणी केली. यातही एकूण ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. माझी देखील पहिली तपासणी केली असून माझा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. माझी प्रकृती चांगली असून कोणतेही काळजीचे कारण नाही. वैद्यकीय सल्ल्यानुसार मी होम कॉरंटाइन झालो आहे.’ अशी आ.पाटील यांनी फेसबुक वर पोस्ट करत सांगितले आहे.

त्याचप्रमाणे माझ्या व माझ्या स्टाफच्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी देखील स्वतःची तपासणी करून घ्यावी, स्वत: ला होम क्वारंटाईन करून घ्यावे व वैद्यकीय सुचनांचे पालन करावे., असेही त्यांनी सांगितले आहे.

आ.पाटील यांच्या स्टाफ मधील ड्राइव्हर, ऑपरेटर, सुरक्षा रक्षक तसेच इतर कर्मचारी असे एकूणसहा जणांचा यात समावेश असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांत यांच्याशी कोणाचा संपर्क झाला असेल तर त्यांनी स्वतःहून कोरोना चाचणी करून घ्यावी अथवा अलगीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी अगदी पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात गावोगावी भेटी देऊन कंटेनमेंट भागातील नागरिकांना मास्क, सॅनिटाझर आणि अर्सेनिक अल्बम-३० गोळ्या उपलब्ध करून दिल्या. वाटपाचे काम अजूनही सुरूच आहे. याच दरम्यान आ.पाटील यांच्या स्टाफ मधील एका कर्मचाऱ्याचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्क झाला आहे, त्यामुळे सोबतच्या इतर ५ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here