बार्शी : आ. राजेंद्र राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना. नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन, त्यांना बार्शी तालुक्यातील बार्शी तुळजापूर रस्ता राज्य मार्ग क्र. २०६ ची राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नती करणे बाबत, तसेच बार्शी तालुक्यातून जाणारा माढा-वैराग-उस्मानाबाद रस्ता राज्य मार्ग क्र.२०३ ची राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नती करणे बाबत व बार्शी तालुक्यातील रस्ते मजबुतीकरण व नूतनीकरणासाठी सी.आर.एफ.अंतर्गत निधी उपलब्ध व्हावा या मागणी संदर्भातील पत्र दिले.
यावेळी नितीन गडकरी यांनी याबाबत सकारात्मकपणे प्रतिसाद देत, पत्रातील मागण्यांचा प्रामुख्याने विचार करून लवकरच निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी माढ्याचे खासदार मा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील उपस्थित होते.
