सर्वांपर्यंत मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर-आमदार चंद्रकांत जाधव : यादवनगरात रेशन कार्डचे वाटप

0
191

सर्वांपर्यंत मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर-आमदार चंद्रकांत जाधव : यादवनगरात रेशन कार्डचे वाटप

कोल्हापूर : समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगीतले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यादवनगर भागात प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थींना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
आमदार जाधव म्हणाले, सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम आणि अधिक परिणामकारक करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग काम करीत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बदलामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांला मदत देता येत असून नव्याने लाभार्थी जोडता येत आहेत.

समाजातील तळागळातील व्यक्ती, वंचित घटकांपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात रेशन कार्ड नसल्याचा तोटा लक्षात आला आणि नव्याने रेशनकार्ड काढण्यासाठी मागणी वाढली. त्यानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशिल आहे.

आई, वडीलांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास, सामाजिक स्तर उंचावून, प्रत्येक नागरिकाचे राहणीमान व जीवनमान उंचावले असा सल्ला आमदार जाधव यांनी उपस्थित तरुणाईला दिला.

माजी नगरसेवक आप्पासो गायकवाड म्हणाले, रेशनकार्ड काढून देण्याच्या नावाखाली आजपर्यंत अनेकांनी राजकारण केले ; मात्र आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे भागातील लोकांचे रेशनकार्डचे स्वप्न पूर्ण झाले.


यावेळी सागर शिंदे यांचा आमदार जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डवरी समाजाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, श्रमसाफल्यचे चेअरमन विश्वास शेंडगे, सागर गायकवाड, बालेचंद गडकरी, शाहरुख बागवान, इंदुमती चव्हाण, आदिनाथ शिंदे, फारुख कुरणे, शरफुद्दीन शेख, विनया गायकवाड, रुपाली पाटील, यास्मिन बेलापूरे, शमीना जैनापुरे, शबनम मनेर, ऊजा जानकर, लता वायदंडे, लक्ष्मी बंसवडे, अश्विनी ढोले, रेखा पाटील, विमल रास्ते, सुमन भोसले आदी उपस्थित होते.

फोटो
यादवनगर भागात प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थींना रेशन कार्डचे वाटप करताना आमदार चंद्रकांत जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here