अल्पवयीन मुलीचा विवाह :आई वडिलांसह इतरांवर बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

0
209

अल्पवयीन मुलीचा विवाह :आई वडिलांसह इतरांवर बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

बार्शी/प्रतिनिधी: अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी आई, वडील, मामासह लग्नाला उपस्थतीत असेलेल्यावर व छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू- सासऱ्यांविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार कलम १०,११ व ९ अंतर्गत गुरुवारी (ता. १४) गुन्हा दाखल झाला आहे. चाईल्डलाईनच्या मदतीने हा गुन्हा दाखल झाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी तालुका पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदयानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात १८ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. लग्न झाले तेव्हा ती अल्पवयीन होती. शिक्षण करण्याची इच्छा असतानाही घरच्यांनी तिचा बार्शी तालुक्यातील मुलाशी इच्छेविरुद्ध विवाह लावून दिला. विवाह झाल्यानंतर सासू, सासर व पती यांच्याकडून तिचा छळ सुरु झाला. त्यामुळे फिर्यादी आई- वडिलांकडे गेली होती. मात्र आई- वडिलांनी तिला सासरी पाठवण्याचा प्रयत्न केला.

१८ वर्षाच्या तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे की, २० फेब्रुवारी २००३ माझी जन्म तारीख आहे. आई, वडील व भाऊ असे आम्ही मुंबईत तिघेजण काशिमिरा येथील ग्रीन व्हुड बिल्डींग समोरील चाळीत राहत. आमचे मुळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तेथे आजी व आजोबा राहतात. काशिगाव येथे माझे १० वीपर्यंत शिक्षण झाले. ११ वीचे शिक्षण सुरु असताना कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे कॉलेज बंद होते. त्यानंतर मे २०२० मध्ये आम्ही मुळगावी कोराळ (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे गेलो. तेथे आजी व आजोबा राहतात.

मे २०२० मध्ये दिलीप मेंडे व प्रविण मेंडे व त्याचे नातेवाईक मला पाहण्यासाठी आले. तेव्हा मुलगा प्रविण मेंडे यांने मला पसंत केले. परंतु मी त्याला पसंत केले नव्हते. मुलगा पसंत नसल्याचे व माझे वय १७ असुन मला अजुन १८ वर्ष पुर्ण झालेले नाही. मला शिक्षण घ्यायचे असल्याचे आई व वडील यांना सांगिले. परंतु त्यांनी ऐकले नाही.

आई व वडील असे मेंडे यांच्या घरी गेले. त्यानंतर त्यांनी लग्न करावे लागेल असे सांगीतले. माझे लग्न वडीलांनी, राजाराम सुरवसे यांनी जमविले. जून २०२० मध्ये मेंडे यांचेशी प्रविण यांच्या गावी उडेगाव (ता. बार्शी, जि. सोलापुर) येथे लग्न करून दिले.

कोरोनाची महामारी सुरु असल्याने लग्नात जास्त लोक नव्हते. फक्त घरातील व प्रविण मेंडे याचे घरातील लोक हजर होते. माझ्या लग्नाच्या लग्नपत्रीका छापल्या नव्हत्या. परंतु लग्नात माझे व मेंडे असे आमचे लग्नाचे फोटो काढलेले आहेत.

लग्न झाल्यानंतर आई, वडील व इतर नातेवाईक मुळगावी उस्मानाबाद येथे निघुन गेले. मी सासरी राहत होते. तेव्हा पती प्रविण मेंडे, सासु छाया मेंडे व सासरे दिलीप मेंडे हे मला घरात कोंडुन शेतात कामासाठी जायचे. ते मला घराचे बाहेरही जावु द्यायचे नाहीत. घरातील कामावरून शिवीगाळी करायचे, त्यामुळे मी त्रासले होते. त्यामुळे आई- वडील यांना पती, सासरे, सासु त्रास देत असलेलबाबत सांगीतले. परंतु त्यांनी बोलणयाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आजी- आजोबांकडे राहु लागले. परंतु शिक्षण घ्यायचे असल्याने व आई- वडीलांनी कमी वयात लग्न केलेल असल्याने पती, सासु, सासरे हे त्रास देत असल्याने जानेवारी २०२१ मध्ये आई- वडील घेवुन काशिमिरा येथे आले. मला आई- वडील हे सारखे सासरी जाणेबाबत सांगत असल्याने चाईल््ड लाईन येथे फोन केला. त्यांना झालेला प्रकार सांगितला.

चाईल्ड लाईन यांनी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी काशिमिरा पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला. २० फेब्रुवारी २०२१ रोजी मला १८ वर्षे पुर्ण झाले आहेत. सध्या मी बोरीवली येथील आश्रय निवारा केंद्र येथे राहत आहे. माझी आई, वडील, पती प्रवीण मेंडे, सासु, सासरे दिलीप मेंडे लग्न लावुन देणारे ब्राम्हाण (नाव, पत्ता, माहीत नाही), माझे लग्न जमविणारे व वडीलांचे मामा राजाराम सुरवसे व इतर लग्नासाठी हजर असलेल्यांवरती मी अल्पवयीन आहे हे माहीत असताना सुद्धा माझे लग्न करून दिले. सासरकडील पती व सासु, सासरे यांनी घरगुती कारणावरून शिवीगाळी केली व मानसिक त्रास दिला म्हणुन त्याचेविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here