Minister Shambhuraje Desai visits Shiv Sena Medical Aid Room Karmala Solapur Branch
शिवसेना वैद्यकीय मदतकक्ष करमाळा सोलापूर शाखेला मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट
कोरोनाच्या वाढत्या संकटात सुद्धा आपल्या कार्यातून रुग्णांना अविरत सेवा पुरवणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या करमाळा सोलापूर शाखेला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली यावेळी शिवसेना कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी मंत्री महोदयांचे स्वागत केले. त्यांच्या सोबत उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे हे सुद्धा उपस्थित होते.


यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या कामाचे तोंडभरून कौतुक करित त्यांनी स्वतः देखील वेळोवेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या रुग्णसेवेचा अनुभव घेतला असल्याचे बोलून दाखविले.
तसेच गरजू रुग्णांच्या हाकेला कक्ष आणि कक्षाची टीम सदैव तत्परतेने धावून जाते असते असे गौरवोद्गार काढून भविष्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य असेच अविरतपणे सुरू राहो तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अगणित गरजवंत रुग्णांना त्याचा लाभ मिळो अशा शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची शाखा लवकरच पाटण तालुक्यात सातारा येथे किंबहुना संपूर्ण सातारा जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात यावी अशी अपेक्षा मंत्री संभूराज देसाई यांनी व्यक्त केली. यानुसार लवकरच मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे मांगीश चिवटे यांनी बोलून दाखविले.