बार्शीतील वाणी प्लॉटमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा, 4 लाखांचा ऐवज लंपास

0
218

बार्शी – शहरातील वाणी प्लॉट परिसरात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून जवळपास साडे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रविवार 13 जून रोजी गजेंद्र घेना जाधव (68 वर्षे) राहणार वाणी प्लॉट यांच्या घरावर रात्री दोनच्या सुमारास सशस्त्र दरोडा घालून चोरट्यांनी 4,31,000 रुपयांचा ऐवज पळवला अशी फिर्याद त्यांनी बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

फाईल फोटो

याबाबत हकीकत अशी की, गजेंद्र जाधव हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते त्यांची पत्नी दोन मुले व त्यांच्या मुलांच्या दोन बायकासह वाणी प्लॉट येथे एकत्र राहत असून 13 जून रोजी इतर लोक आपापल्या रूम मध्ये जेवण करून झोपले असता, फिर्यादी व त्यांची पत्नी हे रात्र अकरा वाजता वाजता हॉलमध्ये झोपलेले असताना रात्री दोनच्या सुमारास त्यांना झोपमोड होऊन जाग आली. त्यावेळी, पाहिले की त्यांच्याजवळ दोन इसम हातात चाकू व दांडके घेऊन उभे होते. तसेच त्यांनी झीरो बल्पच्या मंद प्रकाशात पाहिले की तिसऱ्या इसमाच्या हातात टॉर्च होती त्यांच्या पत्नीही जाग्या झालेल्या त्यांना दिसले व त्यांच्या जवळ एक इसम हातात लाकडी दांडके घेऊन थांबलेला होता. इतर दोन इसम कपाटापाशी उभे असलेले त्यांना दिसले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

हे इसम अंदाजे 20 ते 25 वयोगटातील अंगाने मध्यम बांध्याचे तरुण होते. त्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता, फिर्यादीजवळ उभ्या असलेल्या एकाने त्यांना चाकूचा धाक दाखवून लाकडी दांडकयाने उगारून पायावर मारत चूप बैठने का l हीलने का नई तुम्हारे पास पैसा है l तुम्ही हीले तो बुढ्डी को मार देंगे असे धमकावून दांडक्याने पायावर मारत कपाट उचकटून कपाटामधील सोने मोबाइल व रोख रक्कम सहित 4,31,005 रु. चां ऐवज चोरला. त्यानंतर, कीचनच्या मागच्या दारातून हे सर्वजण निघून गेल्याची फिर्याद बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास बार्शी शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर उदार हे करत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here