बार्शी: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रॉमा युनिट साठी बार्शी कारांच्या वतीने मदतीचा ओघ सुरूच आहे. बाजार समिती व व्यापारी बांधवानी 51 लाख रुपये दिल्यानंतर ईद मिलाद चे निमित्त साधत नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी यांच्या वतीने 51 हजाराची देणगी दिली.

तांबोळी यांच्या मातोश्री श्रीमती.महेबुबबी अ.गनी तांबोळी.यांनी प्रकृती ठीक नसताना संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव व सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे यांना घरी बोलावून ही देणगी दिली.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


तांबोळी परिवाराचे बार्शीच्या राजकीय व सामाजिक जडणघडणित महत्वाचे योगदान आहे. तसेच ते दानशूर घराणे म्हणून ओळखले जाते.यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, शब्बीर तांबोळी उपस्थित होते.