मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाडया आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरु केले आहे.

आग नेमकी कशामुळे ते अजून स्पष्ट झालेलं नाही. ब्रिटिशकालीन या बाजारात जून महिन्यात लेव्हल दोनची आग लागली होती. क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे अनेक दुकाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सपासून हाकेच्या अंतरावर हे मार्केट आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग
अग्निशमन दलाच्या आठ गाडया घटनास्थळी दाखल
आग नेमकी कशामुळे लागली?