
भारतमातेच्या शहीद जवानांवर सरकारी इतमामात अंत्यंस्कार;आई-वडीलांसाठी घर बांधून देण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले
बार्शी: काश्मीर मधील लेह-लडाख भागात कारगिलकडे जात असताना झालेल्या अपघातात विरमरण प्राप्त झालेले भारतीय सैन्य दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेले बार्शी तालुक्यातील
वाघाचीवाडी येथील जवान भास्कर सोमनाथ वाघ यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .

तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार प्रदीप शेलार यांनी पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली.अमर रहे़ अमर रहे़ शहीद जवान भास्कर वाघ अमर रहे . अशा घोषणा गावकरी देत होते . शुक्रवार दि १७ रोजी सकाळी सहा वाजता सैन्याच्या गाडीतून भास्कर वाघ यांचे पार्थिव गावात आल्यानंतर कुटुंबियासह गावकऱ्यांनी एकच हंबरडा फोडला. त्यानंतर गावातील चौकामध्ये पार्थिव अंत्यदर्शनासासाठी ठेवण्यात आले.
सकाळी नऊ वाजता गावातील प्रमुख मार्गावरुन अंत्ययात्रा काढत गावाशेजारील त्यांच्या शेतातच अत्यंसस्कार करण्यात आले.यावेळी तहसीलदार प्रदीप शेलार, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जि.प. सदस्य मदन दराडे, पांगरीचे सपोनि सुधीर तोरडमल, फौजदार प्रविण सिरसट तसेच सैन्यातील अधिकारी नायक सुभेदार बी.डी. दास, लांन्सनायक अमोल शिंदे,

सचिन पवार, नायक डी.आर. बारगजे, राजू सानप, श्रीराम खराटे , पोलीस पाटील सुवर्णा डोेळे यांनी ही पुष्पचक्र अर्पण भारतमातेच्या सुपुत्राला श्रध्दांजली वाहिली. पांगरी पोलीसांच्या वतीने धुन वाजवून व हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
यावेळी सरपंच विक्रम जाधवर, फौजदार दत्ता वाघ, मडळअधिकारी विशाल नलावडे, तलाठी विनोद मुंढे, ग्रामसेवक घुगे, गोविंद वाघ,रामहरी वाघ,लक्ष्मण वाघ, अर्जून कापसे, श्रीराम जाधवकर,फुलचंद डोळे, अर्जून वाघ, पाडूरंग डोळे, हरिदास वाघ यांनीअंत्यसंस्काराची संपुर्ण तयारी केली होती . मुलगा हा केवळ

दोन वर्षाचा असल्यामुळे पासस्ट वर्षाच्या पित्याला मुलाच्या चितेला मुखाअग्नी देण्याची वेळ आली.यावेळी जवान भास्कर यांच्या मातोश्री राजूबाई, वडील सोमनाथ वाघ,पत्नी राणी वाघ, मुली मानसी व मयुरी व मुलगा यांचे तहसीलदारांनी सात्वंन केले.
आईसाठी बांधकाम सुरु केलेले घर अर्धवटच राहीले
भास्कर यांची आणखी चार वर्षाची सैन्यातील सेवा शिल्लक राहिली होती. गावात जुने छोटे घर होते. मात्र त्याठिकाणी टॉयलेटची सोय नव्हती. त्यामुळे यांनी गावाच्या कडेला आपल्या आई-वडीलांची सोय व्हावी यासाठी घराचे बांधकाम सुरु केले होते. मात्र नियतीने घराचे बांधकाम देखील अर्धवटच राहीले.

तसेच आई वडीलांना नव्या घरात राहीलेले पाहण्याचे भाग्य ही त्यांना मिळाले नाही .
१४ जुलै २००० रोजी भास्कर हे सैन्यात भरती झाले
होते. दूर्देवाने १४ जुलै रोजीच त्यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. पहिली सेवा संपल्यानंतर त्यांनी पुन्हा सेवा वाढवून घेतली होती. ते लेह येथील १३७ फिल्ड रेग्युलंटमध्ये कमांडरच्या गाडीवर चालक म्हणून सेवा बजावत होते

