मोटारसायकल घेण्यासाठी विवाहितेचा छळ , सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ;उपळाईतील घटना
बार्शी : विवाहितेवर चारित्र्याचा संशय घेवुन व माहेरवुन मोटारसायकल घेण्यासठी पन्नास हजार रूपयाची मागणी करत वेळोवेळी शिवीगाळी दमदाटी करून मारहाण जाचहाट केल्याची विवाहीत सोनाली अजय पवार हिने दिल्यावरून नवऱ्यासह सासरच्या सहा जणांविरुद्ध बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

यात नवरा-अजय रमेश पवार ,सासु-सुरेखा रमेश पवार ,सासरा-रमेश अर्जुन पवार ,नंनद-ललिता बापु काळे ,ननंद-बालिका उर्फ काजल विनोद काळे ,नंदावा-विनोद प्रकाश काळे सर्व रा. उपळाई (ठों) ता.बार्शी असे सहा जणांविरुद्ध जाचहाटचा गुन्हा दाखल झाला .
दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सोनाली हिचे लग्न तीन वर्षापुर्वी अजय पवार याच्याशी रितीरिवाजाप्रमाणे झाले होते . लग्नानंतर सासरच्या लोकांनी सोनालीस एक वर्ष व्यवस्थीत नांदवले यादरम्यान मुलगा ही झाला मात्र त्यानंतर नवरा अजय, सासु सासरे, दोन नंदा व नंदावा हे माझे चारित्र्यावर संशय घेवुन सोनालीस शिवीगाळ मारहाण करून जाचहाट करू लागले व अजय हा सोनालीच्या आई वडीलांकडे मोटार सायकलसाठी पन्नास हजार रुपयाची मागणी करत होता.
मात्र आई वडील मोलमजुरी करत असल्याने व पैसे नसल्याने पैसे दिले नाही .तसेच यापुर्वीही सोनालीकडे नवरा अजय याने माहेरवुन एक लाख रूपये घेवुन ये म्हणुन मला मारहाण करून घरा बाहेर काढुन घरात घेतले नव्हते त्यावेळी सोनाली चालत माझे माहेरी मुलासह आल्याचे म्हटले आहे .
सोनाली हिने यापुर्वीही नवरा अजय हा नांदवत नसल्याने बार्शी तालुका पोलीस ठाणेस व महिला तक्रार निवारण केंद्र येथे पण तक्रारी केल्या होत्या . याबाबत अधिक तपास बार्शी तालुका पोलीस करीत आहे .