गाडी खरेदीसाठी ५ लाख रुपयांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ ; पती,सासु सह नंणदाविरुद्ध गुन्हा दाखल
बार्शी प्रतिनिधी : लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसानंतर विवाहितेस तुझ्या आई वडीलांनी लग्नामध्ये मानपान केला नाही, हुंडा दिला नाही , चारचाकी गाडी खरेदी करण्याकरता माहेरवरून पाच लाख रुपये घेवुन ये असे म्हणून मारहाण शिवीगाळ करुन जाच हाट करून शारिरिक,माणसिक त्रास दिल्याबददल प्राची यशपाल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासुसह तीन नंणदाविरुद्ध बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
यात पती यशपाल कैलास गायकवाड सासु कुसुम कैलास गायकवाड (रा.शाहु नगर उस्मानाबाद )व नणंद माया गायकवाड , छाया लिंबारे (रा. आदर्शनगर औसा रोड,लातुर ) प्रियंका गायकवाड ( रा. पुणे ) यांचे विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

फिर्यादीत म्हटले की, दि. २३ जुन २०२० रोजी प्राची हिचा विवाह यशपालशी रितीरिवाजाप्रमाणे बार्शी येथे झाला होता. प्राचीच्या आई -वडिलांनी लग्नात मानपान म्हणून १० तोळे सोने व संसारपयोगी वस्तुसह लग्नात ११,५०,००० रु. खर्च केला होता पती यशपाल हे जि.प उस्मानाबाद येथे कनिष्ठ सहाय्यक वित्त विभागात नोकरीस आहेत.

लग्नांनंतर पंधरा दिवसानंतर मानपान चांगला केला नाही म्हणून टोचुन , स्वयंपाक येत नाही ,घालुन पाडुन बोलणे असे सुरु होते. तसेच विवाहीतेस पती यशपाल याने तु मला पसंत नव्हती पण आईच्या आग्रहाखातर तुझ्याशी लग्न केल्याचे म्हटले. तर तुझ्या आईवडिलांनी हुंडा दिला नाही मला फोर व्हिलर घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये नाही तर तुला नांदविणार नाही त्यावेळी विवाहित प्राचीने लग्नामध्ये खर्च झाला आहे.
आईवडिलांकडे पैसे नाहीत ते पैसे देऊ शकत नाही म्हणताच पती व सासुने मारहाण शिवीगाळ केली व आई -वडिलांकडे निघून जा असे म्हणाले तर तिन्ही नंणदा म्हणायच्या आम्ही सर्वजण कारमध्ये फिरतो तुझा नवरा चालत फिरतो असे म्हणत लहान लहान गोष्टीवरून समक्ष व फोनवरून टोचुन बोलत , किरकोळ कारणावरुन मारहान शिवीगाळ करून शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने ते सहन न झालेने प्राचीने हि बाब आईवडिलास सांगितली.
दरम्यान विवाहितीने पती यशपालने केलेल्या मारहाणीसंदर्भात आनंदनगर पोलीस ठाणे उस्मानाबाद पोलीसात फिर्यादही दिल्याचे म्हटले आहे. अधिक तपास पोलीस सुभाष सुरवसे हे करत आहे .
………