विवाहितेचा छळ, बार्शी पोलिसात सासरच्या सहा लोकांविरुध्द गुन्हा
बार्शी, प्रतिनीधी
सासरेच्या जागेवर पतीस नोकरी लागण्याकरिता माहेराहून दोन लाख रूपये हुंडा आणण्यासाठी व घरातील कामावरुन मारहाण, शिवीगाळी, धमकी देवुन शारीरीक व मानसीक त्रास देवुन छळ करुन क्रुरतेची वागणुक दिल्याप्रकरणी रुकैया इम्तियाज शेख हिने दिलेल्या फिर्यादीवरुन पती, सासू, दीर, तीन नणंदा यांचेविरुद्ध बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत इम्तियाज शेख, रुक्साना शेख, रियाझ शेख ( रा. मोहिनीनगर, केडगाव, अहमदनगर) तर फरजाना शेख भिगवण, जि. पुणे ) शफिया निप्तीवाले

रा. निप्ती,अहमदनगर), आस्मा शेख (रा.मोठी मस्जीदजवळ,अकोला) असे सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे
फिर्यादीचे लग्न 10 मे 2017 रोजी रेणुका मंगल कार्यालय येथे आईवडिलांनी लग्नामध्ये सुमारे पाच लाख खर्च झाला होता. लग्नानंतर सासरच्यांनी एक महिना चांगले सांभाळले. त्यानंतर सुनेला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नानंतर करणीधरणीवरुन पती, सासु, दीर अपमानास्पद बोलत होते. पती मोठयाने आरडाओरडा करुन मला बायको निट भेटली नाही म्हणुन शिवीगाळ करीत असे.
माहेरच्या लोकांना बोलायचे नाही म्हणुन बंधणे घातली सासु व नणंद ही पतीला तुला लय मंद, ढिली बायको मिळाली असे म्हणुन मला अपमानित करत असे. पती हे मला बाहेर सासुसोबत बायकामध्ये बसुन बोलु देत नसत व नेहमी माझे चारित्र्यायावर संशय घेवुन मला मारहाण करत दोन लाख रूपये घेवुन आली तरच तुला नांदवतो अशी फिर्याद दिली आहे. शहर पोलीस अधिक तपास करीत आहे .