मळेगाव पोलखोल फेसबुक अकाऊंटमुळे संपुर्ण गाव वैतागले ; शेकडो महिला पुरुष एसपी कार्यालयात धडकले

0
71

मळेगाव पोलखोल फेसबुक अकाऊंटमुळे संपुर्ण गाव वैतागले ; शेकडो महिला पुरुष एसपी कार्यालयात धडकले

बार्शी: बार्शी तुळजापूर मार्गावर असलेल्या मळेगावातील शेकडो महिला आणि पुरुषांनी फेसबुक या सोशल मीडियावरून गावातील महिला,तरुणींची बदनामी केली जात आहे.गावच्या महिला सरपंचांविरोधात देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहे.यामुळे गावातील महिलांचे आयुष्य उध्वस्त होत आहे.त्यांचे संसार मोडले जात आहे.नांदायला गेलेल्या विवाहित महिलांचे नांदने अवघड झाले आहे.अशा विविध मागण्या घेऊन सोलापूर पोलीस मुख्यालय गाठत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना निवेदन दिले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

हे सर्व मळेगाव पोलखोल फेसबुक अकाऊंट वरून केले जात आहे.या सोशल अकाऊंटची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना जेरबंद करावे अशी मागणी केली आहे.

मळेगाव पोलखोलमुळे दोन समाजात तेढ-
मळेगांव या गावाला जलयुक्त शिवार अभियान मध्ये राज्याचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.गावाची लोकसंख्या जवळपास 3600 आहे आणि अनेक तरुण उच्चशिक्षित आहेत. तंटा मुक्त अभियानामध्ये विशेष शांतता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मळेगाव विविध पुरस्कारानी सन्मानीत झालेले गाव आहे. गावमध्ये अनेक वर्षापासून हिंदु मुस्लिम समाजामध्ये खूप मोठी एकता आहे. तरीही कांही विघ्नसंतोषी लोक हिंदु मुस्लिम समाजाची एकता तोडण्याच्या उद्देश्याने फेसबुक अकाऊंट वर मळेगाव पोल खोल हे खाते उघडुन त्यावर गावातील प्रतिष्ठीत पुरुष, महिला यांची बदनामी केल्या जाणा-या पास्ट टाकल्या जात आहेत.

पोलखोल फेसबुक अकाऊंटमुळे ग्रामस्थ वैतागले

ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार गावातील तिघेजन समाज कंठक, विध्वंसक गावास वेठीस धरत आहेत. फेसबुक अकाऊंट वर मळेगाव पोल खोल हे निनावी खाते उघडून त्यावरून गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीची व महिलांची वैयक्तीक नावे टाकून लज्जा वाटेल अशी भाषा वापरून वैयक्तीक बदनामी केली जात आहे. याचा वापर मळेगाव मधील प्रतिष्ठीत व्यक्तीची व महिलांची बदनामी करण्यासाठीच केला जात आहे.

सदरचे खाते वारंवार बंद केले जाते व नंतर ते उघडले जावून वैयक्तीक बदनामी केली जात आहे. सदर प्रकरणावर गावामध्ये खुप उलट सुलट चर्चा चालू असून या प्रकाराला अनेक ग्रामस्थ वैतागलेले आहेत. प्रतिष्ठीत लोकांची बदनामी करतात आणि बदनामी करून झाली की खाते बंद करतात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कठोर कारवाई करून जेरबंद करा-

मळेगावच्या महिलांनी गावच्या महिला सरपंचला घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांकडे निवेदन दिले आहे .मळेगाव पोलखोल या फेसबुक अकाऊंटमुळे जगणे अवघड झाले आहे.याची दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.मळेगाव पोलखोल फेसबुक अकाऊंट चालवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले दिले आहे .

अधिक माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले की,या फेसबुक अकाऊंटची माहिती यापूर्वी पांगरी पोलीस ठाण्याला दिली होती.पण अद्यापही कारवाई झाली नाही.हे फेसबुक अकाऊंट चालवणारे गावातीलच तरुण आहेत,त्यांची नावे देखील पोलिसांना दिली आहे .संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी केली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here