कोल्हापुरात पुन्हा ओढावले महापुराचे संकट…..!
कोल्हापुरात पुन्हा महापुराचे संकट ओढावले आहे. मागील दोन दिवसापासून कोल्हापुरात पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच गायकवाड वाड्या पर्यंत पंचगंगेच पाणी आल्यामुळे यंदा सुद्धा कोल्हापूरकरांना महापुराचा सामना करावा लागतो आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.


कोल्हापुरात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे अनेक बांधारे पाण्याखाली गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून सविस्तर माहिती घेतली व तसेच सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन सुद्धा पालकमंत्र्यांनी दिले.
पंचगंगा नदीकाठच्या गावांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली गेले असून १०० हून अधिक गावांचा अंशतः संपर्क तुटला आहे. कोल्हापूर शहरातील सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या आजच जिल्ह्यात दाखल होणार आहेत.