ग्लोबल न्यूज : दिवसेंदिवस सोन्याचा भाव सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर जात असताना, ‘व्हिएतनाम’च्या ‘होनोई’ शहरात ‘जिआंग वो लेक’ येथे २४ कॅरेट सोन्यातून संपूर्ण हॉटेल साकारले आहे. ‘डोल्स होनाई गोल्ड लेक’ असे या हॉटेलचे नाव आहे.
जगात कोरोनाच्या माहामारीमुळे सामान्य माणसाच्या खिशापासून सरकारच्या तिजोरी पर्यंतचे पैसे संपत असताना, व्हिएतनाम मधील हे आलिशान हॉटेल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे.

हॉटेलचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी तब्ब्ल अकरा वर्षांचा कालावधी लागला. २००९ साली सुरु केलेले काम २०२० साली पूर्ण झाले. हॉटेल मध्ये ५४,००० चौरस फूट भागात सोन्याच्या टाईल्स आहेत. हॉटेलमधील स्विमिंग पूल, भांडी, प्लेट, शॉवर हेड, आणि टॉयलेट यांना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.
आणि प्रवेशद्वार, दरवाजे, कप्स, वॉशरूम, बाथटब हे संपूर्ण सोन्याचे आहे. या हॉटेलचे छत संपूर्ण सोन्याचे असून डोळे दिपून टाकणारे दृश्य आहे. हॉटेलची लॉबी २४ कॅरेट सोन्याची बनवलेली असून, यावर २० कोटी डॉलर्सचा खर्च करण्यात आलेला आहे.


सोन्यामुळे मनावरचा ताण कमी होते असे मत असल्यामुळे संपूर्ण हॉटेल चोवीस कॅरेट सोन्यात बनवले गेले. तसेच हॉटेलच्या जेवणामध्ये देखील वैशिष्ठयपूर्ण सोन्याचा वापर केला जातो. हॉटेल मध्ये नेमके किती सोने वापरले हे ही एक गूढच आहे.

साऊथीस्ट आशियातील हे सर्वात महागडे हॉटेल आहे. प्रेसिडेन्सिअल सुटीचे एका रात्रीचे भाडे तब्ब्ल ४ लाख ८५ हजार इतके आहे. डबल बेडरूमचे ७५ हजार, तर सर्वात कमी पैसे असणाऱ्या रूमचे भाडे २० हजार इतके आहे.

हॉटेलला २५ माजले आणि ४०० खोल्या आहेत. हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर फ्लॅट्स देखील विक्रीला आहेत.
