कोरोना बाधीत रुग्णांना मोफत नाष्टा व दोन वेळचे जेवण देण्याचा शुभारंभ
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : आमदार राजाभाऊ राऊत मित्र मंडळ व दि बार्शी मर्चंट असोशिएशन,बार्शीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शहरातील सर्व कोविड हॉस्पिटल मधील कोरोना बाधीत रुग्णांना मोफत नाष्टा व दोन वेळचे जेवण देण्याचा शुभारंभ कर्मवीर जगदाळे मामा हॉस्पिटल येथून करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव,बापूसाहेब शितोळे,बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, डॉ. राम जगताप,नगरसेवक विजय चव्हाण,संदेश काकडे,रितेश वाघमारे, व्यापारी असोसिएशनचे दामोदर काळदाते, तुकाराम माने,नवनाथ गपाट,देवकीनंदन खटोड,भरतेश गांधी,सचिन मडके,कांतीलाल मर्दा,अरूण मुंढे,संतोष बोराडे,सुनील ढाळे,बापूसाहेब पाटील,बाळासाहेब पुरोहित,धनू पाटील आदी उपस्थित होते.