बार्शीत कै. कस्तुरबा गांधी मूकबधिर व जिव्हाळा मतिमंद शाळेत राज्यातील पहिल्या मोफत शिघ्र निदान उपचार केंद्राचा शुभारंभ

0
685

बार्शीत कै. कस्तुरबा गांधी मूकबधिर व जिव्हाळा मतिमंद शाळेत राज्यातील पहिल्या मोफत शिघ्र निदान उपचार केंद्राचा शुभारंभ

बार्शी :- दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व समाज कल्याण कार्यालय सोलापूर, यांच्या आदेशानुसार बार्शी शहर व तालुक्यात मोफत शिघ्र निदान व उपचार केंद्र बार्शीतील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित,कै. कस्तुरबा गांधी मूकबधिर निवासी शाळा बार्शी, जुने उपळाई स्टेशनच्या पाठीमागे कुर्डुवाडी रोड बार्शी व बार्शीतील जिव्हाळा मतिमंद शाळा या दोन ठिकाणी सुरू झाले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दिव्यांगांचे श्रद्धास्थान डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेच्या पुजनाने व फित कापून केंद्राचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अरुण बारबोले, संस्थेचे पर्यवेक्षक मोहन लोहार यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर गणेश जाधव, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय सावंत यांनी केले, आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून केंद्राबाबतच्या उपाययोजना, उद्दिष्टे बाबत माहिती सांगितली. डॉक्टर श्री.गणेश जाधव, संस्था निरीक्षक श्री. मोहन लोहार यांनी,अर्ली इंटरव्हेशन 0 ते 3 वयोगटासाठी कसे राबवावे, बार्शी शहरातील व तालुक्यातील मुला-मुलींना याचा कसा उपयोग होईल याबाबत मुलांना व पालकांना सविस्तर मार्गदर्शन झाले.

कार्यक्रमास सोजर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सुजित करपे , सोजर आय. टि. आय चे प्राचार्य स्वप्निल कारंडे व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूञसंचालन सूर्यकांत राऊत यांनी केले. आभार सचिन भोसले यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. बार्शी शहर व तालुक्यात शिघ्र निदान उपचार केंद्र चालू केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरूण बारबोले, यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम हा पुर्ण शासकीय नियमाने सुरक्षित अंतर राखून,मास्कचा वापर करून, सँनीटायझरचा वापर करून संपन्न झाला

बार्शीतील राजीव स्मृति बहुउद्देशीय संस्थेच्या जिव्हाळा मतिमंद मुलांची शाळा,422 गाडेगांव रोड बार्शीत ही सुरू केले आहे.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे बालरोग तज्ञ डॉ.संदीप पाटील व फिजीओथेरपीस्ट डॉ.गितांजली पाटील, पर्यवेक्षक मोहन लोहार ,नगरसेवक कय्युम पटेल होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री.आप्पासाहेब बसाटे यांनी केले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here