स्व. गोलू चव्हाण यांना 251 मित्रांनी रक्तदान करून वाहिली श्रद्धांजली

0
264

बार्शी (प्रतिनिधी) स्व. अंकुल (गोलु) चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमीत्त स्व. अंकुल (गोलु) चव्हण मित्र मंडळ , बार्शी यांच्या वतिने आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 251 जणांनी रक्तदान करून मित्राला मरणोत्तर श्रद्धांजली अर्पण केली.

शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार नाना गव्हाणे यांच्या हस्ते झाले.या वेळी झालेल्या रक्तदान शिबिरास माजी मंत्री दिलीप सोपल यांनी भेट दिली. त्यांनी अंकुल चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मृती बाबत बोलताना अंकुल यांच्या आठवणी जागृत केल्या. या बोलताना सोपल म्हणाले की , अंकुल हा सर्व सामान्य घरातुन पुढे आलेला एक सच्चा कार्यकर्त्या आणि समाजभान असणारा युवक होता. त्याच्या नंतर त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवार यांनीही अंकुल च्या आठवणी जागृत राहाव्यात या साठी रक्तदान शिबिर सारखे उपक्रम राबवत उत्तम कार्य केले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या शिबीरास माजी मंत्री . दिलीप सोपल, युवा नेतृत्व आभिजीत राऊत , सुरज डिसले, रामभाई शहा ब्लड बँकेचे अध्यक्ष अजित कुंकलोळ , माजी उप.नगराध्यक्ष आबाजी पवार, मंगलताई शेळवणे, , कालभैरव पतसंस्थेचे चेअरमन देविदास बापु बारंगुळे, तानाजी डिडवळ , पांडुरंग गव्हाणे ,नागजी कातुरे व आजी माजी नगरसेवक तसेच आनेक मान्यवर उपस्थीत होते.तसेच महिलांनी देखील रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी त्यांच्या जिवलग मित्र यांनी परिश्रम घेतले. तसेच रक्तदान समारंभाची सांगता रेड क्रॉस सोसायटी चेअरमन अजितदादा कुंकूलोळ यांनी स्वर्गीय अंकुल गोलू चव्हाण मित्र मंडळाचे व रक्तदात्यांचे आभार मानले. या शिबिरा साठी मार्गदर्शन लहूजी चव्हाण , रितेश वाघमारे,नागजी कातुरे ,विजय दळवे आदीचे लाभले. तर आभार बाळासाहेब गव्हाणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here