व्हॉल्व्ह असलेल्या NOT मास्कद्वारे कोरोना संसर्गाचा धोका; वाचा सविस्तर-

0
316

व्हॉल्व्ह असलेल्या NOT मास्कद्वारे कोरोना संसर्गाचा धोका; वाचा सविस्तर-

कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्क घालणे सुरक्षित मानले जात आहे. मात्र, व्हॉल्व्ह असलेल्या N95 या मास्कमुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होत नाही.करोना महामारी रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या हे विरोधात असल्याचं केंद्र सरकारने म्हटले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य सेवा महासंचालक राजीव गर्ग यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना यासंदर्भात एक पत्र लिहलं आहे.

अधिकृत आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी लोक N95 मास्कचा अयोग्य वापर करतात, विशेषत: त्याचा ज्यात श्वासोच्छवासाठी एक व्हॉल्व लावण्यात आला आहे.

व्हॉल्व्ह असलेले N95 मास्क कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उचललेल्या पावलांच्या विरोधात आहे.यामुळे विषाणू मास्कच्या बाहेर पडण्यास प्रतिबंध होत नाही. हे रोखण्यासाठी संपूर्ण तोंड बंद होईल अशाच प्रकारच्या मास्कचा वापर करावा.

N95 मास्कचा अयोग्य वापर थांबवण्यासाठी संबंधितांना सूचना करण्याचं आवाहनही गर्ग यांनी केलं आहे.

व्हॉल्व्ह असलेले मास्क फक्त आत येणारी हवा शुद्ध करतात. मात्र, बाहेर सोडली जाणारी हवा शुद्ध होत नाही. तसेच मास्क मधून बाहेर सोडली जाणारी हवा जास्त गतीने बाहेर पडत असते.
समजा एकदा कोरोना संसर्ग झालेला व्यक्तीच्या संपर्कात आपण आल्यास मास्कच्या वाल्व्हमधून बाहेर पडणाऱ्या तूषारातून संसर्गाचा धोका असू शकतो.

खरं तर हा मास्क हवेच्या प्रदूषणापासून आपले संरक्षण करत असतात असे तज्ञाचे म्हणणं आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here