सांगोला : शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना

0
200

सांगोला : शेततळ्यात सायफन टाकताना पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचविताना पती-पत्नीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास धायटी (ता. सांगोला येथील (पुजारी वस्ती) येथे घडली . शीतल मल्हारी पुजारी (वय २२) व मल्हारी बाळू पुजारी (वय ३०) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.

धायटी येथील मल्हारी पुजारी यांची पत्नी शीतल या आज सकाळी ७ च्या सुमारास शेततळ्यात सायपन टाकत असताना तिचा पाय घसरून पाण्यात पडली. यावेळी बुडणार्‍या पत्नीला वाचवण्यासाठी पती मल्हारीने शेततळ्यात उडी घेतली मात्र शेततळ्याच्या शेवाळलेल्या पाण्यामुळे दोघांनाही वर न येता आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here