ज्योतीबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेस चप्पलने मारहाण, बघुन घेण्याची दिली धमकी,गुन्हा दाखल

0
316

अनाधिकृत चोरून नळ कनेक्शन घेतलेल्या ग्रामस्थाला नळाची डिपाॅझिट रक्कम व पाणीपट्टी रक्कमेची मागणी केल्याचा राग मनात धरुन ग्रामस्थाने चक्क महिला ग्रामसेविकाला चप्पलने मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील ज्योतीबाचीवाडी येथे घडला.

मधुकर वैजिनाथ कापसे असे याप्रकरणात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्रामसेवीका रोहीनी अशोक घुगे वय -31 वर्षे,  नेमणुक ज्योतीबाची वाडी ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्या ज्योतीबाचीवाडी ता. बार्शी यागावी 10 जुलै 2014 पासुन नेमणुकीस आहेत.


   सकाळी 08/30 वाचे. सुमारास  ज्योतीबाची वाडी ता.बार्शी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कर्तव्यावर हजर होते व त्यानंतर  ज्योतीबाची वाडी ता.बार्शी या गावातील ज्या नागरीकांनी अवैद्य नळाचे कनेक्शन घेतलेले आहे व नळाची पाणीपट्टी भरलेले नाही अशा नागरीकांकडे पाणीपट्टी वसुलीसाठी व अवैद्य नळ असनारे यांचेकडे नळ अधिकृत करण्यासाठी शासकिय नियमाने डिपाॅजिट रक्कम जमा करणेकामी गावातून घरोघरी मी व माझे सोबत ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी रघुनाथ कोळी असे दोघे मिळुन शासकिय काम करत फिरत होतो. गावातील सुब्राव देवीदास कापसे व प्रकाश विठ्ठल कापसे यांचेकडे गेलो असता त्यांनी त्यांच्याकडील नळ डिपजिट रक्कम व पाणीपट्टी रक्कम जमा केली जमा केल्यानंतर नियमानुसार मी त्यांना जमा रक्कमेची पावती दिली त्यानंतर 10/00 वाचे. सुमरास गावातील त्याच गल्लीतील मधुकर वैजिनाथ कापसे याचे घरी आम्ही गेलो व त्यांना तुम्ही अनाधिकृत नळ चोरुन घेतलेला आहे त्याबाबत मी त्यांना त्याची रितसर डिपजिट रक्कम व पाणीपट्टी रक्कमेची मागणी केली.

तेव्हा त्याने मला डायरेक्ट येवुन तुझ्या बापाची पेंड आहे का पाणी आम्ही ग्रामपंचायतचे वापरतो व पैसे मागायचा तुमचा काय संबंध असे म्हणून शिवीगाळी करुन चप्पल घेवुन अंगावर मारणेस धावुन आला त्यावेळी मी बाजुला होण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने त्याचे उजव्या हातात पकडलेली चप्पल माझे पाठीवर मारली त्यावेळी बाजुस थांबलेले ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी रघुनाथ कोळी, सुरेश विश्वनाथ कापसे, किशोर रामचंद्र कापसे, किशोर भारत धेंडे, नारायण सोपान कापसे वगैरे लोकांनी सोडवासोडवी करुन त्यास आरे नालायका तु एका महिलेस चपलीने मारतोस काय रे म्हणून त्यास रागावुन ढकलुन हाकलुन दिलेले आहेत. सदर मधुकर वैजिनाथ कापसे याने त्याचे हस्तकामार्फत मला आतापर्यंत घडले प्रकाराबाबत पोलीस ठाणेस फिर्याद न देणेसाठी धमकावुन धमकी देत होता म्हणून मला फिर्याद देणेस उशीर झाला आहे. सदर बाबत मी आमचे वरिष्ठ गटविकास अधिकारी शेखर सावंत यांना घडला प्रकार फोनवरुन कळविलेला आहे.

तरी नमूद वेळी व ठिकाणी मधुकर वैजिनाथ कापसे रा. ज्योतीबाचीवाडी ता. बार्शी याने मी ग्रामसेवक असलेचे माहीत असुनही ग्रामसेवक या नात्याने त्यांना अनाधिकृत नळ डिपजिट रक्कम व पाणीपट्टी रक्कमेची मागणी केली असता त्याने मला वरील प्रमाणे वाईट-वाईट शिवीगाळ करुन त्याचे पायातील चप्पल काढुन हातात पकडुन माझे पाठीवर चप्पल मारुन मी करत असलेल्या शासकिय कामात अडथळा निर्माण केला आहे व तु गावात नोकरी कशी करते तेच मी पाहतो अशी धमकी दिली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here