शहाजीबापू पाटील शिंदे गटाचे जॉनी लिव्हर -अमोल मिटकरी
शहाजी बापू पाटील हे फक्त करमणुकीचं पात्र
‘काय झाडी, काय डोंगर आणि हॉटेल, सगळं ओक्केमध्ये आहे’, या आपल्या डॉयलागने अचानक प्रसिध्दीच्या झोतात आलेले सांगोल्याचे
बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात प्रचंड शाब्दिक वाद सुरू आहेत.


संजय राऊतांना गुरू मानणारे अमोल मिटकरी हे पात्र राजकारणात नविन आहे. यांचे हाल राऊतासारखे होतील खरे तर पवारांची निवड चूकलीच अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली होती आता त्याला अमोल मिटकरींनी उत्तर दिले आहे त्यावरून वाद वाढणार हे नक्की.
शहाजीबापू पाटील शिंदे गटाचे जॉनी लिव्हर आहेत. महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस त्यांच्याकडे फक्त करमणूक म्हणून पाहतो. माझ्या भविष्याची चिंता त्यांनी करू नये. स्वतःच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं.काम तर
काही होत नाही फक्त डॉयलागबाजी येते. हा तर महाराष्ट्राची करमणूक करणारा नवीन जॉनी लिव्हर आहे अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली
आहे.