“सोलापूर (ग्रा.) व उस्मानाबाद पोलीसांच्या संयुक्त तकारवाईत जम्बो हातभट्टी नष्ट.”
अमर चौंदे
उस्मानाबाद. उस्मानाबाद (ग्रामीण ) पोलीस ठाणे व सोलापूर जिल्ह्यातील वैराग पो.ठा. यांची सामाईक हद्द आहे. याच हद्दीवर वैराग पो.ठा. हद्दीतील भातंब्रा शिवारातील यमाई तांडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टी दारु निर्मीती होत असल्याची व ही दारु दोन्ही जिल्ह्यातील सिमा भागांत वितरीत होत असल्याची गोपनीय खबर वैराग पो.ठा. चे पोनि- श्री.अरुण सुगावकर व उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. चे पोनि- श्री. दत्तात्रय सुरवसे यांना मिळाली होती.


या हातभट्टीवर छापा टाकण्यासाठी दोन्ही पोलीस ठाण्यांनी संयुक्त नियोजन करुन आज दि. 09.09.2020 रोजी सकाळी 05.30 वा. सु. यमाई तांडा येथे छापा टाकला. यावेळी तेथे अवैध गावठी दारु निर्मीतीची एक जम्बो हातभट्टी आढळली. प्रत्येकी 200 लि. क्षमतेच्या 4 पिंपांना एकत्र जोडून द्रव पदार्थ उकळून (डिस्टीलेशन) या हातभट्टीत दारु निर्मीती केली जात असल्याचे आढळले.

तसेच अवैध गावठी दारु निर्मीतीसाठी लागणारा द्रव पदार्थ आंबवण्यासाठी जमीनीत एक हौद बनवलेला व 40 पिंपात द्रव पदार्थ साठवलेला आढळला. हा आंबवलेला द्रव पदार्थ संयुक्त पथकाने जागेवर ओतून नष्ट केला असुन गुन्हा नोंदवण्याची कारवाई वैराग पो.ठा. मार्फत केली जात आहे.