व्यापाऱ्यांची 62 लाखाची फसवणूक अभिजित अरुण कापसे यांना जळगाव पोलिसांनी केली अटक

0
556

व्यापाऱ्यांची 62 लाखाची फसवणूक अभिजित अरुण कापसे यांना जळगाव पोलिसांनी केली अटक ; न्यायालयाने दिली सहा दिवसांची पोलीस कोठडी

बार्शी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन चे माजी संचालक व  बार्शी तालुक्यातील जवळगाव येथील अरुण कापसे याचे चिरंजीव  अभिजित  अरुण कापसे याने दोन वर्षांपूर्वी चनादाळ व्यवसाय करणारे दोन व्यापाऱ्यांची ६१ लाख ७६ हजारात फसवणूक केली होती. याप्रकरणी आज अभिजीत कापसे याला जळगाव एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्याला सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या मुळे वैराग परिसरात उलट-सुलट चर्चेना उत आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अधिक माहिती अशी की, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी अभिजित कापसे याला जवळगावातून रात्री १२ वाजेच्या सुमारास अटक केली. यासाठी सपोनि अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विजय बावस्कर यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

अशी घडली घटना


संजय नंदलाल व्यास (वय-५०, रा. विवेकानंद नगर, जिल्हापेठ जळगाव) याचे एमआयडीसीत व्यास इंडस्ट्रिज नावाचे दालमिल कंपनी असून यांनी फिर्याद दिली आहे. तसेच त्यांचे मित्र राजेश ओंकार अग्रवाल यांचे पुष्पा पल्सेस नावाचे चनादाल कंपनी आहेत. दोघे चांगले मित्रही आहे. त्यांच्या चनादाळचा व्यवसाय असल्याने अनेक ठिकाणी व्यवसायाचा व्यवहार होतात.

असाच व्यवहार ६ जानेवारी २०१८ मध्ये संशयित आरोपी अभिजित अरूण कापसे (वय-२६, रा. ज्योतीबाची वाडी, ता. बार्शी जि. सोलापूर) यांच्याशी व्यवहार झाला फिर्यादी संजय व्यास यांनी ३० लाख ८ हजार आणि त्यांचे मित्र राजेश अग्रवाल यांनी ३१ लाख ६८ हजार रूपये किंमतीची चनादाळ दिली. व्यवहार झाल्यानंतर संशयित आरोपी अभिजित कापसे यांने दोघांना प्रत्येकी २५ लाख रूपयांचे धनादेश दिला.

मात्र बँकेत रक्कम पुरेशी नसल्याने दोन्ही धनादेश मिळला(वटला) नाही. तसेच उर्वरीत ११ लाख ७६ हजार देणे बाकी होते. फिर्यादी संजय व्यास आणि त्यांचे मित्र राजेश अग्रवाल यांनी पैश्यांचा तगादा लावला असता पैसे दिले मिळाले नाही.

संजय व्यास यांच्या फिर्यादीवरून २१ ऑगस्ट २०२० रोजी एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पोलीसांनी संशयित आरोपी अभिजित कापसे याला अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुळकर्णी यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी काम पाहिले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here