‘अजितदादांना त्रास होणं स्वाभाविक, कारण ‘ते’ सरकार तेच चालवत होते’, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना जोरदार टोला

0
77

‘अजितदादांना त्रास होणं स्वाभाविक, कारण ‘ते’ सरकार तेच चालवत होते’, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना जोरदार टोला

बार्शी: शेवटी लोकशाहीत तत्व असतात, भूमिका असते, विचार असतो. आमचं सरकार एका भूमिकेतून, बाळासाहेबांच्या भूमिकेतून त्यांच्या विचाराचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. आमची भूमिका जनतेला पटली नसती तर आज राज्यभरात आमचं, आमच्या आमदारांचं, खासदारांचं जे स्वागत होत आहे ते झालं असतं का? सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अजितदादांना त्रास होणं स्वाभाविक आहे कारण ते सरकार तर तेच चालवत होते ना, असा टोलाही शिंदे यांनी लगावलाय. तसंच सरकार चुकीचं काम करत असेल तर सल्ला देण्याचा अधिकार नक्कीच विरोधकांना असल्याचंही शिंदे म्हणाले.

‘निसर्गानेही आमच्या सरकारला साथ दिली’

चहापानाच्या कार्यक्रमानंतर शिंदे आणि फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात एकाही तालुक्यात दुष्काळी स्थिती नाही. हा दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. म्हणजे निसर्गानेही आमच्या सरकारला साथ दिलीय. विरोधी पक्षनेत्यांनी काही मुद्दे आपल्या पत्रकार परिषदेत मांडले.

आम्हाला सात पानी पत्र दिलं आहे. मला वाटलं हा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे की काय. अजितदादांनी म्हटलं की आम्ही 750 निर्णय घेतले. धर्मवीर चित्रपटाचा उल्लेख करत ते म्हणाले की एकनाथ कुठेय? मी माझ्या जागेवरच आहे. निर्णय घ्यायला खंबीरपणे उभं राहावं लागतं. त्यात शेतकऱ्यांना 50 हजार अनुदानाचा निर्णय असेल.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here