लाच स्विकारताना बार्शी तालुक्यातील पाटबंधारे विभागाचा कर्मचारी जाळ्यात

0
159

बार्शी : शेतजमीन विक्री करण्याकरीता पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखला देण्याकरीता आवश्यक असणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याकरीता ७ हजाराच्या लाचेची मागणी करुन, ती स्विकारताना पाटबंधारे विभागाच्या मोजणीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सुखदेव मारुती सुतार, (वय ५३) मोजणीदार, शाखाधिकारी पाटबंधारे शाखा, जवळगाव ता. बार्शी असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नांव आहे.
यांतील तक्रारदार यांची मौजे सासुरे ता. बार्शी येथील शेतजमीन विक्री करण्याकरीता पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखला देण्यासाठी आवश्यक असणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याकरीता ७ हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम सुखदेव सुतार यांनी स्वतः स्विकारली. म्हणून त्यांच्याविरुध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संजीव पाटील, पोलीस उपअधीक्षक, घुगे, जानराव यांनी पार पाडली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here