ग्लोबल न्यूज – इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तेराव्या सिझनची वाट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी. यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरु होणार आहे. तर आयपीएलची फायनल आठ नोव्हेंबरला होईल. बीसीसीआयच्या सूत्रांनी गुरुवारी ‘पीटीआय’ला ही माहिती दिली आहे.

आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 19 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 8 नोव्हेंबरला फायनल खेळवली जाईल. यानुसार आयपीएल 13 सिझनचं हे आयोजन 51 दिवसांचं असेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारा T20 विश्वचषक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आयपीएलचं आयोजन होण्याची दाट शक्यता आहे.

आयपीएलचा हा 13 वा हंगाम 26 सप्टेंबरपासून सुरु होईल असं सांगितलं जात होतं, मात्र आता एक आठवडा आधीच सुरु होणार आहे. कारण त्यानंतर टीम इंडियाचा आस्ट्रेलिया दौरा होणार आहे.

अधिकाऱ्यानं सांगितलं की, भारतीय संघाला आस्ट्रेलिया सरकारच्या नियमानुसार त्या दौऱ्यात 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे.
कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा T20 वर्ल्ड कप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये वर्ल्ड कप टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ल्ड कप पुढे ढकलल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनचा रस्ता मोकळा झाला आहे.
प्रत्येक संघाला सरावासाठी किमान एका महिन्याची गरज असल्यामुळे 20 ऑगस्टला संघ युएईसाठी रवाना होतील. त्यानंतर सर्व खेळाडूंना सरावासाठी किमान 4 आठवडे मिळणार आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आयसीसीच्या नियमांप्रमाणे 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासाठी आयपीएल स्पर्धा लवकर सुरु करण्याचं बीसीसीआयने ठरवलं आहे.