अवैध पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश ; 42 गावठी कट्टे, 66 जिवंत काडतुसे व एक कार जप्त

0
424

अवैध पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश ; 42 गावठी कट्टे, 66 जिवंत काडतुसे व एक कार जप्त

ग्लोबल न्यूज – अवैध अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील 26 आरोपींच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-4च्या पथकाला यश आले. या टोळीकडून 42 गावठी कट्टे, 66 जिवंत काडतुसे व एक कार जप्त करण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गणेश माळी (रा-सांगवी ), ग्यानोबा उर्फ गोटू मारुती गिते ( रा- परळी, जि- बीड ), मनिसिंग गुरमुख सिंग भाटीया, कालुसिंग जसवंत सिंग ( दोघे रा. सिंघाना, धार, मध्य प्रदेश), कुश नंदकुमार पवार (रा.तळेगाव दाभाडे), प्रसन्न ज्ञानेश्वर पवार (रा. गोडुंब्रे , शिरगाव), आकाश उर्फ बाळा जगन्नाथ वाघमोडे (रा. कुर्डूवाडी, जि.सोलापूर ) योगेश विट्ठल कांबळे (रा.परांडा, जि. उस्मानाबाद), सिराज सलीम शेख (वय.34 रा. आंबेठाण, ता.खेड), प्रकाश उर्फ पप्पु किसन मांडेकर (वय. 27, रा. आंबेठाण, ता.खेड, जि.पुणे) यांना विविध ठिकाणावरून अटक करण्य़ात आली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी, हे सर्व आरोपी मानसिंग गुरुमुखसिंग भाटिया या टोळी प्रमुखाला संपर्क साधून देशी कट्टे, पिस्तूल व जिवंत काडतुसाची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

तसेच कुश पवार, प्रसन्न पवार, प्रकाश मांडेकर, सिराज शेख, यांना अटक करुन त्यांच्याकडून 18 पिस्टल/गावठी कट्टे व 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

हा शस्त्रसाठा त्यांनी आकाश पडळघरे (रा-रिहे, ता-मुळशी, जि-पुणे), ओंकार ऊर्फ अभिजीत बाजीराव ढमाले (वय-२६, रा. ढमाले चाळ, जुनी सांगवी) संतोष राठोड (रा-तळेगाव दाभाडे), तुषार महादु बावकर, (वय-25, रा- कासारसाई, ता- मुळशी, जि- पुणे), शिवकुमार मुरगन ऊर्फ बल्ली (रा- आंबेडकर नगर, देहूरोड ) यांना विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

तसेच आकाश उर्फ बाळा जगन्नाथ वाघमोडे व योगेश विठ्ठल कांबळे यांनी मध्यप्रदेश येथून एकूण 27 पिस्टल/गावठी कट्टे आणून ते अक्षय दिलीप कैमकर (वय-28 रा- मेडद, ता- माळशिरस जि-सोलापुर), योगेश ऊर्फ आबा बापुराव तावरे (वय-24, रा-माळेगाव, वा-बारामती) चेतन ऊर्फ मामा गोविंद लिमन, (वय-28, रा- लिंबाची तालीम, ता-हवेली), प्रज्ञेश संजय नेटके (रा. जयंत भोर चेम्बर्स गावडे-भोर आळी, चिंचवडगाव), मयुर अनिल घोलप, (रा-, बिबवेवाडी, पुणे), विकी अनिल घोलप, (रा- बिबवेवाडी, पुणे), राजु भाळे, (रा- इंदापूर ) , सोमनाथ ऊर्फ सोमा रमेश चव्हाण (रा- कालगाव, ता- कराड, जि- सातारा) यांना विकले होते.

या प्रकरणातील एकूण 26 आरोपी निष्पन्न करुन त्यातील 15 आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून एकूण 19 लाख 89 हजार 500 रुपये किंमतीचे 42 पिस्टल/गावठी कट्टे व 66 जिवंत काडतुसे व सेलोरो कार जप्त करण्यात आली आहे.

या आरोपींवर या पूर्वी दाखल असलेल्या विविध केसेसमध्ये विविध पोलीस ठाण्यात 14 पिस्टल जमा असून इतर आरोपी व बाकी शस्त्रांचा शोध सुरु आहे. या गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख करीत आहेत.

… थेट मध्यप्रदेशातून टोळी प्रमुखाला अटक

युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस शिपाई प्रशांत सैद यांनी मध्यप्रदेश येथील आरोपींचा तांत्रिक विश्लेषण करून एका पथकाला मध्यप्रदेशात पाठविले.

या पथकाने वेषांतर करून शस्त्र खरेदी-विक्री आणि आरोपींबाबत सविस्तर अभ्यास केला. त्यानंतर पोलीस उपयुक्त ( गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्याचा ऍक्शन प्लॅन तयार केला.

त्यानुसार पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख यांचे पथक मध्य प्रदेशात पाठवले. या पथकाने मध्यप्रदेशातील थाना-मानवार ( जि. ) धार येथे सापळा रचून या टोळीचा म्होरख्या मानसिंग गुरुमुखसिंग भाटिया याला जेरबंद करुन त्याच्याकडून 11 गावठी पिस्तूल आणि 22 जिवंत काडतुसे जप्त केली.

भाटियाकडे केलेल्या चौकशीत त्याने टोळीतील अन्य सदस्य आणि पिस्तूल खरेदी करणाऱ्यांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई करुन टोळीतील सदस्य आणि पिस्तूल खरेदी करणारे असे एकूण 15 आरोपी गजांआड केले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here